महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

क्रांतीज्योती सावित्रीबाई (कविता दुर्गा देशमुख परभणी )

 क्रांतीज्योती सावित्रीबाई 



🙏🙏🙏🙏🙏🙏

देश होता गुलामगिरीच्या वेड्यात 
क्रांतीची एक ठिणगी पडली 
अस्पृश्यता, अत्याचार दुर करण्या 
ज्योतीची एक ज्योत नडली (1)

स्त्री एक वासनेच साधन 
अस्तीत्व फक्त चुल अन् मुल 
आपल्याच मुलीचा देत बळी 
आंधळ्या धर्माची डोक्यात भुल (2)

अंधकार दुर करण्या समाजाचा 
 जन्माआली  एक ज्योती 
अन्यायाला वाचा फोडण्या 
पेटविल्या त्याने ज्ञानाच्या वाती (3)

 भाग्यवान पत्नी मी ज्योतीची सावित्री 
अभिमानाने उंचावली मान 
ताट मानेने स्त्रीने जगायचे कसे
ज्योतीबाने दिले ज्ञानाचे दान (4)

ज्योतीराव फुलेशी विवाह झाला 
स्त्रीच्या कर्तृत्ववाचा अविष्कार झाला 
स्त्रियाचे जीवन उंचावण्यासाठीचा 
ज्योती सावित्रीने एक संकल्प केला (5)

सावित्रीने ज्ञानाची ज्योत पेटविली 
जाती वर्ण लिंगभेद विरुद्ध लढाई 
शिक्षणाची दरवाजे खुली झाली पण 
स्त्रीयानी शिकणे पाप समजले जाई (6)

वाईट होता काळ वाईट परिस्थिती
सोडुन सा-या पंरपंरा चालीरीती 
भिडेवाड्या शाळा सुरु करुन 
गुंग केली या षंडाची मती (7)

स्त्रियाची व्यथा डोळ्याने पाहिली 
नरक यातना तिनेच सोसल्या 
बालविवाह सती केशवपन कुप्रथा 
तिच्या अज्ञानात आम्ही पोसल्या (8)

मुलीसाठी पहिली शाळा उघडुन 
रचला स्त्री शिक्षणाचा पाया 
किती सोसल्या सावित्रीने यातना 
नाही जाऊ देनार आम्ही वाया (9)

सत्यशोधक समाजाची सांभाळली धुरा 
 अनाथाची दलिताची माय झाली 
यशवंत पुत्र घेतला अनाथ दत्तक 
बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केली (10)

विधवाचे केशवपन रुढी केल्या नष्ट 
स्वताचे घरदार खुले केले रान 
अस्पृश्येवर ओढले कोरडे 
घरातुन सर्वाचा वाढविला मान (11)

अशी सावित्री पुन्हा होणे नाई 
आमची माय अशी महान 
लेखणी देऊन आमच्या हाती 
समाजात दिले आम्हाला स्थान (12)

दुर्गा देशमुख, 
परभणी




No comments:

Post a Comment