महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

August 23, 2017

सरल ताजा अपडेट




*सरल २०१७-१८*

१४/०८/२०१७ च्या शासन अध्यादेशानुसार ..
खालील कामे पुर्ण करावी ठळक बाबी समोर देत आहे . 
अधिक माहितीसाठी जी आर चे वाचन करावे . 

*ठळक बाबी*
👇👇 
१) शेवटचा वर्ग पुर्ण न करता Student Transfer
२)नविन विद्यार्थ्यांची नोंद  New student entry
३)आधार क्रमांक अपडेट 
४)सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये टाकणे  व पुण्हा शाळेत आल्यास ड्रॅपबॉक्स मधुन अटॅच करणे 
५)वर्गोन्नती Promoton 
🔴 इयत्ता १ ते ८ च्या विद्यार्थ्यांचे प्रगत व अप्रगत नोंद करुन पुढच्या वर्गात प्रमोशन करणे .
🔴इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांचे  प्रमोशन मार्क्स टाकुन प्रमोशन करणे व अनुत्तिर्ण झाल आसेल तर ज्या विषयात अनुत्तीर्ण झाला आहे त्याचे कारण सलेक्ट करुन सबमिय बटन दाबावे .
🔴इयत्ता १० वीतील विद्यार्थ्यांचे प्रमोशन करावे . त्यांचे मार्क्स सिस्टीम द्वारे आटोमॅटीक आलेले आहेत त्याना प्रमोट करावे  . जर आले नसतील तर राज्यस्तराला कळवावे . त्या विद्यार्थ्याची दुरुस्ती होइपर्यंत प्रमोट करु नये 
🔴१२ वीच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स सुद्धा आटोमॅटीक आलेले आहेत ते तपासुन प्रमोट करावे अन्यथा चुकांची दुरुस्ती करुन प्रमोट करावे .
६) शेवटचा वर्ग पुर्ण केलेल्या student transfer 
शाळेतील सर्वात वरच्या वर्गातील विद्यार्थी ड्रॉपबॉक्स मध्ये ठेवण्याची सुविधा दिलेली आहे .
आपल्या शाळेत आसे विद्यार्थी टीसी घेवुन आले आसल्यास ज्या शाळेतुन  विद्यार्थी आला आसेल त्या शाळेचा युडायस कोड टाकुन ड्रॉपबॉक्स मधुन अटॅच करुन घ्यावे व पहिल्या शाळेतील मुख्याध्यापकाने अपृवल दिल्यास आपल्या हजेरी पटावर तो विद्यार्थी दिसणार आहे .
 स्टुडंट पोर्टल ची वरील १ ते ६ मुद्यांची  माहिती मुख्याध्यापक स्तरावरुन २५/०८/२०१७ पर्यंत पुर्ण करावी .

७)विद्यार्थी नोंदणी (दुसरा टप्पा )
विद्यार्थी पोर्टलला पुढील मुद्यांची माहिती भरण्याची सुविधा देण्यात येत आहे .
1) Category
2)BPL
3)Religion
4)Disability
5)Birth Place
6)Adress 
ही माहिती ३०/०९/२०१७ पर्यंत पुर्ण करावी .

८) शाळा पोर्टल 
यामध्ये माहिती भरावयाची आहे .व चुकांची दुरुस्ती करावयाची आहे .
९) संचमान्यता - वर दिलेल्या सर्व बाबी तसेच नवीन मुलांच्या नोंदी व वर्गोन्नती तसेच गरजेप्रमाणे शाळा पोर्टलमध्ये दुरुस्ती किंवा खोली संख्येमध्ये बदल योग्य पातळीवर मान्य झाले के शाळेची संच मान्यता सरल प्रणालीद्वारे करण्यात येइल .
ज्या शाळांची संचमान्यता होणार नाही त्यांचा माहे सप्टेबरचा पगार काढला जाणार नाही .

१०)संस्था- काही संस्थानी अकापेक्षा अधिक नोंदणी क्रमांक वापरुन एकापेक्षा अधिक वेळा माहिती भरेलेली आहे त्यामुळे अडचण येत आहे व अडचणी आलेल्या संस्थाची यादी शिक्षणाधिकारी (माध्यमिक)यांच्या लॉगिनला दिलेली आहे ती या स्तरावरुन दुरुस्त करुन घ्यावी .
ही माहिती ३१/०८/२०१७ पर्यंत पुर्ण करुन घ्यावी .

११) स्टाफ पोर्टल : ज्यानी स्टाफ पोर्टलला अद्याप माहिती भरलेली नाही त्यानी १५/०९/२०१७ पर्यंत माहिती भरुन घ्यावी अन्यथा ऑक्टोबरचा पगार काढला जाणार नाही .

कामाचे वेळापत्रक:
१६.१ शाळास्तर -
सर्व पोर्टल मध्ये माहिती परिपुर्ण भरुन अंतिम करणे दिनांक २५/०८/२०१७ 

१६.२ केंद्रस्तर -
प्राप्त माहिती अंतिम करणे - दिनांक ३१/०८/२०१७ 

१६.३ तालुकास्तर -
आवश्तक दुरुस्त्या तपासुन शाळांकडुन अंतिम करणे - दिनांक ०७/०९/२०१७ 

१६.४ स्टाफ पोर्टल साठी कार्यक्रम खालील प्रमाणे 
१६.४.१ शाळानी दिनांक १५/०८/२०१७ 

१६.४.२ केंद्रप्रमुखानी २२/०९/२०१७ 

१६.४.३ 
गटशिक्षणाधिकारी यानी २९/०९/२०१७ 
पर्यंत स्टाफ पोर्टल Approve/Riject करावे .

या सर्व बाबी आपणास करावयाच्या आहेत .

अधिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २०१७०८१४१८२२३४३०२१ हा जीआर पहावा .