आंतरजिल्हा बदली संपूर्ण मार्गदर्शन
आंतरजिल्हा बदली नवीन शासन निर्णय , अॉनलाईन आंतरजिल्हा बदली अर्ज वेळापञक तसेच अॉनलाईन बदली अर्ज प्रत्यक्ष कसा भरायचा याची सचिञ माहितीपुस्तीका आपणास महाराष्ट्र स्कूल टिचर या ब्लॉग वर उपलब्ध करून देत आहे
Gr व माहितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावर क्लीक करा
आंतरजिल्हा बदली नवीन शासन निर्णय , अॉनलाईन आंतरजिल्हा बदली अर्ज वेळापञक तसेच अॉनलाईन बदली अर्ज प्रत्यक्ष कसा भरायचा याची सचिञ माहितीपुस्तीका आपणास महाराष्ट्र स्कूल टिचर या ब्लॉग वर उपलब्ध करून देत आहे
Gr व माहितीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटनावर क्लीक करा
विषय | डाउनलोड लिंक |
---|---|
नविन आंतरजिल्हा बदली GR | Download |
अॉनलाईन अर्ज प्रत्यक्ष कसा भरावा माहितीपुस्तिका | Download |
__________________________________________
*आंतरजिल्हा बदली बाबत सूचना* __________________________________________दिनांक २८/०४/२०१७ ते ०१/०५/२०१७ या मुदतीमध्ये *पुणे,कोल्हापूर,मुंबई*
या विभागातील जिल्ह्यांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यानंतर वरील वेळापञक प्रमाणे इतर विभागातील जिल्ह्यांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी
या विभागातील जिल्ह्यांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यानंतर वरील वेळापञक प्रमाणे इतर विभागातील जिल्ह्यांना स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी
*आंतरजिल्हा बदलीसाठी जे शिक्षक कर्मचारी ट्रान्सफर पोर्टल मध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाच्या सूचना* :
१) आपण जी माहिती स्टाफ व ट्रान्सफर पोर्टल मध्ये भरणार आहात ती माहिती काटेकोरपणे व अचूक भरावी. *सध्या ही माहिती भरताना आपणास कोणतेही कागदपत्र सिस्टिम ला upload करावयाचे नसले तरी गटशिक्षणाधिकारी लॉगिन ला सर्व मूळ कागदपत्र तपासली जाणार आहे व या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती या ग्रामविकास मंत्रालयाकडे पाठवल्या जाणार आहे याची नोंद घ्यावी*.जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरल्यास/वेरीफाय केल्यास त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याच्या सूचना मा. सचिव साहेब,ग्रामविकास मंत्रालय यांनी परवाच्या V. C. मध्ये दिलेल्या आहेत याची नोंद घ्यावी.
२) *आंतरजिल्हा बदलीसाठी ट्रान्सफर पोर्टलमध्ये अर्ज करताना आपण सेवेत कायम(Permanent) असल्याचा आदेश (स्थायित्व लाभ) आपणाकडे असणे आवश्यक आहे हे लक्षात घ्यावे.आपणाकडे जर स्थायित्वाच्या लाभाचा आदेश नसेल तर आपण आंतरजिल्हा बदली साठीचा अर्ज ट्रान्सफर पोर्टल मध्ये भरू शकणार नाही.तरी ज्या शिक्षक बांधवांना आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बदली करावयाची आहे अशा बांधवांकडे जर कायम (स्थायित्व) आदेश नसेल तर सदर कर्मचाऱ्यानी त्वरित आपल्या स्थायित्वाचा आदेश प्राप्त करून घ्यावा व त्यानुसार अर्ज करावा*.
३) आंतरजिल्हा पोर्टल गेले दोन दिवस टेस्टिंग साठी सुरु ठेवण्यात आले होते.यामध्ये माहिती भरण्यासंदर्भात कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती. तरीदेखील काही बांधवांनी या पोर्टल मध्ये माहिती भरत असल्याचे लक्षात आले आहे.तरी अशा सर्व बांधवांना सूचित करण्यात येते की,ट्रान्सफर पोर्टल उद्यापासून सुरु होत आहे.यापूर्वी *टेस्टिंग च्या काळात ट्रान्सफर पोर्टल मध्ये ज्या बांधवांनी सूचना नसताना देखील माहिती भरलेली आहे म्हणजेच दिनांक २८/०४/२०१७ वेळ सकाळी १० वाजेपर्यंत ज्यांनी माहिती भरलेली आहे त्यांची ही भरलेली माहिती उद्या सकाळी १० वाजता पूर्णतः delete केली जाणार आहे याची नोंद घ्यावी*.अशा सूचना नसताना माहिती भरलेल्या शिक्षक बांधवांना विनंती आहे की आपण पुन्हा माहिती भरावयाची आहे.आम्ही माहिती भरलेली आहे या समजुतीत आपण राहून पुन्हा नव्याने माहिती भरली न जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही ही शक्यता गृहीत धरून आपणास ही सूचना देण्यात येत आहे हे लक्षात घ्यावे.
४) बदली संदर्भात *whatsapp,facebook किंवा इतर सोशल माध्यमातून वेगवेगळे मेसेज येत असतात हे आपणास माहिती आहेच.परंतू सरल स्टाफ पोर्टल ट्रान्सफर पोर्टल,वरिष्ठ कार्यालय व राज्यस्तरीय सरल व्हाट्सअप्प ग्रुप व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून आलेल्या सूचना वाचून फॉर्म भरताना आपण विशेष काळजी घ्यावी.वाचनात आलेल्या सुचनांबाबत शहानिशा करूनच त्यावर विश्वास ठेवावा किंवा नाही ही सर्वस्वी आपली जबाबदारी आहे.आपली एक चूक आपणास बदली वा अन्य महत्वाच्या प्रक्रियेपासून आपणास वंचित ठेवू शकते हे लक्षात घ्यावे.*
५) स्टाफ पोर्टल मध्ये माहिती भरून क्लस्टर/केंद्रप्रमुख यांच्या लॉगिन मधून सदर माहिती वेरीफाय केल्यानंतरच सरल ट्रान्सफर पोर्टल मधून आपण आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरावयाचा आहे.हा फॉर्म आपण आपल्या शाळेच्या लॉगिन मधून भरावयाचा आहे. *ज्या कर्मचाऱ्याना शाळेच्या लॉगिन मधून आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरणे शक्य नसेल अशा कर्मचाऱ्यासाठी गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून देखील हा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी*.मात्र शाळा अथवा गटशिक्षणाधिकारी लॉगिन मधून आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरण्यासाठी एक महत्वाची अट अशी आहे की *आपली स्टाफ पोर्टल ला माहिती भरून ती माहिती क्लस्टर लॉगिन मधून वेरीफाय असणे आवश्यक आहे.वेरीफाय नसलेली माहिती असणाऱ्या कर्मचाऱ्यास कोणत्याही परिस्थितीत बदलीसाठीचा फॉर्म भरता येणार नाही.*
६) स्कूल पोर्टल,स्टाफ पोर्टल व ट्रान्सफर पोर्टल चा User Id व पासवर्ड हा एकच असून जर हा पासवर्ड आपण विसरला असाल तर हा पासवर्ड स्कूल लॉगिन मधून रीसेट करावयाचा आहे हे लक्षात घ्यावे.स्कूल पोर्टल मधून पासवर्ड रिसेट केल्यानंतर एका तासाने नवीन पासवर्ड स्टाफ पोर्टल लॉगिन करताना वापरावा हे आपणास माहिती आहेच.परंतु *सध्या स्कूल पोर्टल काही तांत्रिक अपडेशच्या कारणास्तव मागील 3 दिवसापासून बंद (Downtime) आहे.त्यामुळे ज्या शाळणाचा पासवर्ड विसरला असेल अशा शाळांना स्टाफ अथवा ट्रान्सफर पोर्टल ला लॉगिन करण्यासाठी समस्या येऊ शकते.तरी या पोस्ट द्वारे सर्वांना सूचित करण्यात येत आहे की लवकरच स्कूल पोर्टल सुरु होणार असून आपली ही समस्या सोडवली जाणार आहे.त्यामुळे याबाबत अधिक काळजी करू नये.*
टीप: दोन दिवसांपासून स्टाफ पोर्टल सुरु केले असल्याची सूचना देण्यात आलेली होती ही बाब खरी असली तरी काही *अपडेशनच्या कारणांमुळे प्रत्यक्ष लॉगिन होताना invalid id व invalid पासवर्ड अशी सूचना दिली जात होती.त्यामुळे आपला पासवर्ड चुकलेला आहे असा समज निर्माण झालेला आहे.परंतु उद्यापासून स्टाफ पोर्टल व ट्रान्सफर पोर्टल सुरु केले जाणार असल्याने ही समस्या बऱ्याच प्रमाणात संपुष्टात येईल,त्यामुळे पासवर्ड बाबत अधिक काळजी करू नये*.
७) स्टाफ पोर्टल मध्ये काम करत असताना आपणास काही अडचणी येऊ शकतात ही बाब लक्षात घेऊन आम्ही सर्वांना आपल्या समस्या कळविण्यासाठी एक सुविधा उपलब्ध करून देत आहोत. *या सुविधेअंर्तगत आपण आमच्या Pradeepbhosale.blogspot.in या website-blog ला भेट द्या.या ब्लॉग मध्ये Contact Us या Tab मधील Help या बटनावर क्लिक करा.त्यानंतर आपणास एक फॉर्म open झालेला दिसून येईल.या फॉर्म मध्ये आपण आम्हाला आपली समस्या सविस्तरपणे कळवू शकता.*आपली ही समस्या तंत्रस्नेही व अनुभवी तज्ञ मंडळीद्वारे लवकरात लवकर सोडवली जाईल.आपल्या समस्येचे उत्तर आपणास Email द्वारे कळवले जाईल याची नोंद घ्यावी.
*किंवा*
*आमच्या या मदतीसाठी दिलेल्या फॉर्मवर जाण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.*
*लिंक*
https://goo.gl/OuoQ5u
*राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य व्हायचे असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*
*लिंक*
goo.gl/j9nFGk
अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला भेट द्या.
(संकलित माहिती)
सौजन्य
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in
Top International Schools In Bangalore
ReplyDeleteBest Cbse Schools In Bangalore
Best Schools In Bangalore
Top Schools In Bangalore
Best Schools In Bangalore
Top Schools In Bangalore
Schools In Electronic City
Schools In Bangalore
nice content thanks for sharing