महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

March 6, 2023

होळी विशेष कविता :- सुंदर माझी होळी ग ........................( दुर्गा प्रल्हादराव देशमुख , परभणी )

 दिनांक :-६ मार्च २०२३
*वार :- सोमवार*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
माझी होळी 
   
सुंदर माझी होळी ग
धरु विज्ञानाची कास 
 जाळुन टाकु अंधश्रध्दा 
धरु प्रगतीचा ध्यास। 1


सुंदर माझी होळी ग
रंगात तिच्या न्हाऊ 
व्यसन टाकु जाळुन 
नवतीचे गीत गाऊ।   2


सुंदर माझी होळी ग
काजळी काढु मनाची 
कोरडे ओढु पंरपंरेवर 
वाट पहाते त्या क्षणाची। 3


सुंदर माझी होळी ग
करा आनंदाची पोळी 
वाईटाला देऊन फाटा 
मारा तुम्ही गोळी।  4


सुंदर माझी होळी ग
कृष्ण- बलरामाच्या नात्याला 
देवाचे मागते आशिर्वाद 
गव्हाच्या भरभराट पात्याला |5


सुंदर माझी होळी ग 
कोकणातला शिमगा छान 
होडी समुद्रात नांगरण्याचा 
स्त्रियांना मिळतो मान  | 6


सुंदर माझी होळी ग
आदिवासी पंरपरा नृत्याला 
काठीची करतात कसरत 
सलाम त्यांच्या कृत्याला  |7


सुंदर माझी होळी ग 
बंगालचा उत्सव वसंत 
रविंद्रनाथाच्या शांतिनिकेतनची 
मिरवणुक सर्वाना पसंत | 8


सुंदर माझी होळी ग
मनिपुरची रात्र आनंदात 
पारंपरिक पोशाख घालुन 
नृत्य पोर्णिमेच्या चांदण्यात   | 9


सुंदर माझी होळी ग
कोकणात बाहुलाबाहुलीचे लग्न 
रांगोळी पताका सजवुन 
लोकगीतात सारेच मग्न  |10


सुंदर माझी होळी ग 
रंगाची रंगत न्यारी 
विविधतेत एकता 
आहे सर्वाना प्यारी ||||||||


दुर्गा प्रल्हादराव देशमुख, परभणी