महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

September 11, 2017

प्रगत विद्यार्थी,वर्ग व शाळा ठरविण्याचे निकष 2017-18 करिता

   प्रगत विद्यार्थी,वर्ग व शाळा ठरविण्याचे निकष   2017-18 करिता    
        



कोणता विद्यार्थी प्रगत?

    कोणता वर्ग प्रगत?


  कोणती शाळा प्रगत?



थोडक्यात माहिती------->>>>>>>
                             दि.७ सप्टेंबर २०१७ पासुन संपुर्ण महाराष्ट्रात पायाभूत चाचणी मराठी,गणित,इंग्रजी,सा.विज्ञान विषयाची शाळा स्तरावर घेत आहोत.यावर्षी पासुन भाषा व गणित विषयात मूलभूत क्षमता प्रश्नांमध्ये ७५% गुण व इतर प्रश्नांमध्ये ६०% गुण मिळाले तर त्या विद्यार्थ्यांना आपणास पायाभूत चाचणी व संकलीत चाचणी मध्ये प्रगत समजायचे आहे.इंग्रजी व सा.विज्ञान विषयासाठी मूलभूत क्षमता अभिप्रेत नाहीत.त्यामुळे इंग्रजी, सा.विज्ञान विषयात एकूण गुणांपैकी ६०% गुण मिळाले तरीही विद्यार्थी प्रगत समजला जाईल.

चाचणीचा शासन निर्णय दि.१४.०७.२०१७ पेज क्रमांक ३ वर कलम १.४ मध्ये मुलभूत क्षमतेची स्पष्ट व्याख्या केलेली आहे.
*भाषा विषयासाठी वाचन व लेखन,गणित विषयासाठी मूलभूत क्षमता संख्या लेखन,संख्याची तुलना, विस्तारीत रुप,स्थानिक किंमत,बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रीयांचा अंर्तभाव केलेला आहे.फक्त  मराठी व गणित विषयाचा स्पष्ट उल्लेख आहे.*
  वाट्सअप वर येणार्‍या पोस्टचा आधार पेपर तपासणी साठी घेऊ नये.
प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे वर्गीकरण शिक्षकांना करावे लागेल. 

PDF  स्वरूपात

शासन निर्णय डाउनलोड करायचा तर खालील बटनावर क्लीक करा।  
       

1 comment: