महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

June 20, 2017

अंतर्गत बदली फॉर्म असा भरावा



अंतर्गत बदलीचा कार्यक्रम सुरु झाला आहे पहिल्यांदाच हि प्रक्रिया online राबविण्यात येत आहे तेव्हा या प्रणाली ची थोडक्यात आपणास माहिती उपलब्ध करून देत आहे mhschoolteacher.blogspot.in या ब्लॉगवर याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.


विशेष संवर्ग भाग 1

विशेष संवर्ग भाग 1 साठी *Transfer Portal*
सुरु झाले आहे...
      *विशेष संवर्ग भाग 1* अंतर्गत खालील 1⃣3⃣ घटकांचा समावेश होतो...

1 *पक्षाघाताने आजारी शिक्षक ..*
2*अपंग शिक्षक,मतिमंद मुलांचे व अपंग मुलांचे पालक...*
3*ह्रदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक..*
4 *जन्मापासून एकच किडनी असलेले/मुत्रपिंड रोपण केलेले/डायलिसीस सुरु असलेले शिक्षक...*
5 *कॅन्सरने आजारी शिक्षक...*
6 *आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी/विधवा..*
7*विधवा कर्मचारी..*
8 *कुमारिका कर्मचारी..*
9 *परित्यक्ता/घटस्फोटीत महिला कर्मचारी..*
10*वयाची 53 वर्षे पूर्ण केलेले शिक्षक/शिक्षिका...*
11 *मेंदूचा आजार झालेले शिक्षक..*
12*स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/मुलगी/नातू/नात(स्वातंत्र्यसैनिक हयात असेपर्यंत..)*
13 *थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक..*

 🍁विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत शिक्षकांना *बदली नको*असेल तर बदलीतून *सूट* मिळते. *अशा नकार देणा-या शिक्षकांच्या जागा कोणालाही मागता येणार नाहीत..*या संवर्गातील शिक्षक अगदी *सेवानिवृत्तीपर्यंत*  त्याच शाळेत राहू शकतात..
🍁विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत शिक्षकांना बदली हवी असेल तर जिल्ह्यातील *कोणत्याही बदलीपात्र* शिक्षकाची जागा तो मागू शकतो..( *सिनीयर असो किंवा ज्युनियर*)



💻 *Online विवरणपत्र भरण्याची कार्यपद्धती...*

🌷HM login वरुन *Transfer Portal login* करा..
🌷4 टॅब दिसतील,त्यातील *Intra-District Transfer* या टॅबला क्लिक करा...
🌷त्यातील 1 ली *Transfer Application* या टॅबला क्लिक करा..
🌷 *Select Designation*मध्ये Under graduate/Graduate यापैकी जे असेल ते क्लिक करा..
🌷 *Select teacher* मधून ज्यांचा form भरायचा त्या शिक्षकाला select करा..
🌷संबंधित शिक्षकाची *staff portal* ला *verify*केलेली माहिती दिसून येईल..
     ज्यांची माहिती staff portal ला भरलेली नाही किंवा verify केलेली नाही, *त्यांची नावे विवरणपत्र भरण्यासाठी दिसणार नाहीत...*
🌷 *Select Category* वर क्लिक करा..
🌷 *Select sub-category* वर क्लिक करा...
🌷 *13 संवर्ग* दिसतील..लागू असेल तो निवडा..
🌷 *Select subject* मध्ये सहशिक्षक असेल तर All subject असं दिसेल..पदवीधर/विषयशिक्षक असेल तर शिक्षकाचा विषय निवडा..
🌷त्यानंतर *"बदलीपात्र यादीत माझं नाव असलं तरी मी विशेष संवर्ग भाग 1 मध्ये असल्यामुळे मला बदलीतून सूट हवी.."*असं वाक्य आहे..
   बदलीतून सूट हवी असेल तर *Yes*ला क्लिक करा...
    बदली हवी असेल तर *No* ला क्लिक करा...
🌷 *Yes* ला क्लिक केल्यास 20 पसंतीक्रम भरण्याची गरज नाही/भरता येणार नाहीत..
🌷 *No*ला क्लिक केल्यास जास्तीतजास्त 20 पसंतीक्रम भरता येतील...
🌷पसंतीक्रम भरताना  *जिल्हा* निवडा किंवा आपोआप दिसेल...
🌷त्यानंतर *तालुका* निवडा..जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची यादी दिसेल...त्यातील हवा तो तालुका निवडा..
🌷 *Select village*मध्ये निवडलेल्या तालुक्यातील महसूली गावांची यादी दिसेल..गाव निवडा..
🌷 *Select school* मध्ये निवडलेल्या महसूली गावातील सर्व जि.प.शाळांची नावे दिसतील,त्यातील शाळा निवडा...
🌷अशाप्रकारे 20 शाळा निवडून *add* करत राहा..
🌷भरलेल्या पसंतीक्रमामध्ये *Save* करण्याच्या आधी बदल करता येतील..
🌷पसंतीक्रम *delete* करता येईल.. *update* करता येईल..पसंतीक्रम   *खाली-वर* करता येईल..
🌷 *आवश्यक*तसे विवरणपत्र भरल्यानंतर save करा..
🌷अर्ज save केल्यानंतर प्रिंटसाठी कसा दिसतो हे पाहण्यासाठी टॅब क्र.2 *Veiw option(draft version)*क्लिक करा..हा form मराठीतून दिसेल..
🌷माहिती तपासून ती बरोबर असल्यास टॅब क्र.3 *Verification of transfer application* करा..
🌷माहिती पुन्हा तपासा..बरोबर असल्यास *verify* करा..
🌷Verify केल्यानंतर विवरणपत्रात *कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही...*त्यामुळे जे काही बदल करायचे असतील ते *verify करण्यापूर्वीच करावेत..*
🌷Verify केल्यानंतर टॅब क्र.4 *Print transfer application* मधून प्रिंट काढावी....

        🌺 *दक्षता*🌺    

*Online form हे HM/BEO login वरुन भरता येणार आहेत..*
   ज्या शिक्षकाचा form भरायचा आहे त्याच्या सहीने offline form *स्थळप्रत* म्हणून HM ने भरुन घ्यावा..
विशेष संवर्ग भाग 1 मधील 13 घटकांपैकी आवश्यक घटकाचा *खरा पुरावा* शिक्षकाकडे उपलब्ध असेल तरच HM login वरुन संबंधित form भरावा..
      *Online विवरणपत्राच्या 3 प्रती काढाव्यात..1 प्रत संबंधित शिक्षकाला द्यावी..1 प्रत पुराव्यासह शाळेत स्थळप्रत म्हणून ठेवावी...1 प्रत पुराव्यासह BEO कार्यालयात जमा करावी...*
     *बदलीच्या कोणत्याही टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते...*

🌷 *साधारणपणे गरजेपुरते बदल होऊन अशीच प्रक्रिया यापुढे टप्पा क्र.3,4 व 5 मध्ये राबविली जाईल......*

1 comment: