महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

January 21, 2017

अग्नितांडवातून चिमुरड्याला वाचवणाऱ्या निशाची शौर्यगाथा

अग्नितांडवातून चिमुरड्याला वाचवणाऱ्या निशाची शौर्यगाथा *१७ जानेवारी* :


आपल्या शेजारच्या घराला लागलेल्या आगीत झोळीत झोपलेल्या सात महिन्याच्या बाळाला आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवणाऱ्या निशा दिलीप पाटील हिला २०१५/२०१६ या वर्षांचा शौर्य पुरस्कार जाहीर झाला. प्रजासत्ताक दिनी राजधानीत या पुरस्काराचं वितरण होणार आहे. भडगावच्या आदर्श कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी असलेली निशा हि बारावी सायन्सला शिकत आहेत शौर्य पुरस्कार पटकावणारी एकमेव ठरली आहे
. १४ जानेवारी २०१५, सकाळी ७ वाजताची वेळ, जळगावच्या भडगांव येथे राहणाऱ्या कस्तुराबाई आपल्या तीन वर्षाच्या मुलाला शाळेत सोडायला निघाल्या घरी सहा महिन्याचं बाळ झोपलं होतं. शाळा जवळच असल्याने बाळ उठायच्या आत येऊ असा विचार कस्तुराबाईनी केला आणि दोरीवर गोधडी टाकून बांधलेल्या पाळण्यात बाळाला ठेवलं आणि त्या घराबाहेर पडल्या. पण अचानक घरात शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागली. बघता बघता संपूर्ण घराणे पेट घेतला. घराचे छत लाकूड आणि कवलांचे होते.त्यामुळे छताने सुद्धा आग धरली. घरातलं सगळं सामान धु धु करत जाळायला लागलं. घरातून निघणारा आगीचा लोट बघून वेटाळातले लोक गोळा झाले ,घरात कोण आहे कोण नाही याचा पत्ता लागत नव्हता आणि आगीचे लोट वाढतच चालले होते. सुरुवातीला लोकांनी बादलीने पाणी टाकून बघितले पण काही फायदा झाला नाही. तेवढ्यात लोकांना आतून लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. जमलेल्या सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. आता कसं जायचे बाळाला कसं वाचवायचं हा प्रश्न सगळ्यांना पडला. काही लोक पुढे आली पण घरात सिलेंडर सुद्धा आहे. हे कळल्यावर घरात शिरण्याची हिम्मत कुणाची होत नव्हती. आगीने सिलेंडरचा स्फोट होईल या भीतीने लोकांनी कुणालाही घरात जाण्यास मज्जाव केला. पण तेवढ्यात अचानक १६ वर्षांची सडपातळ मुलगी पुढे आली. आतून आर्तपणे किंचाळत रडणाऱ्या सहा महिन्याचा बाळाचा आवाज तिला असह्य होत होता. ही मुलगी त्या आग लागलेल्या घराकडे जायला निघाली तशी लोकांनी आरडाओरड केला. आत सिलेंडर आहे ,स्फोट होईल, तुला मरायचे आहे का ?असं त्या मुलीकडे बघून लोक ओरडत होती. सिलेंडरचा स्फोट होऊ शकतो ? अरे बापरे ,एक क्षण ती मुलगी सुद्धा थांबली पण आतून पुन्हा त्या बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानावर आला मग मात्र मागचा पुढचा काहीही विचार न करता ही सोळा वर्षाची मुलगी चारही बाजूने पेटलेल्या घरात थेट शिरली. सगळीकडे आग आणि काळा धूर पसरला होता .मुलीला दिसलं के ते सहा महिन्याचे बाळ जमिनीवर पडलं होतं. ज्या दोरीवर बाळाचा पाळणा बांधला होता ती पूर्ण पणे जळून गेली होती धुरा मुले ते बाळ काळं कुट्ट झाली होतं. पण सुदैवाने बाळ सुखरूप होतं,लगेच त्या मुलीने बाळाला छातीशी घट्ट पकडलं आणि धावत त्या पेटत्या घरातून बाहेर आली. त्या सहा महिन्याच्या बाळाला बघून प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला. प्रत्येक जण या मुलीला शाबाशकी देत होता. एका क्षणात ही मुलगी गावात चर्चेचा विषय ठरली. या मुलीचे नाव आहे निशा दिलीप पाटील…निशाच्या या शौर्याची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आणि तिला या वर्षीचा प्रतिष्ठित बाल शौर्य केला .निशा हा देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत स्वीकारणार आहे. इतकच नाही तर २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये हत्तीवर बसवून सन्मानपूर्वक निशाची मिरवणूक निघेल . निशाच्या या धाडसाचं पूर्ण महाराष्ट्राला कौतुक आहे. *जगू आणि जगवू या*

No comments:

Post a Comment