महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

January 26, 2017

💐 जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा जांब प्रजासत्ताक दिवस 💐


प्रजासत्ताक दिन जांब

आज दिनांक 26 जानेवारी 2017 रोजी जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा जांब येथे प्रजासत्ताक दिवस मोठया हर्षोल्हासात पार पडला.
सर्वात प्रथम सकाळी गावातून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून देशभक्तीपर नारे दिले.नंतर ग्रामपंचायत कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला.
त्यांनतर लगेचच जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा जांब येथे झेंडा वंदनाचा कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमाला गावातील जेष्ठ नागरिक ,महिला, तरुण मंडळी सर्व विद्यार्थी शाळेचे सर्व शिक्षक ,मु.अ उपस्थित होते.
 झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाल्यावर
मु.अ श्री हरेश इंगळे यांनी















प्रजासत्ताक दिनाची विस्तृत माहिती मुलांना दिली.त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शा.व्य.समितीचे अध्यक्ष श्री संतोष घायवट तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंचताई शालिनीताई जगदीश घायवट, ग्रामसेवक श्री पोटे हे उपस्थित होते.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळेचे मु.अ. श्री हरेश इंगळे यांच्या हस्ते पार पडला.
संचालन श्री निलेश लटपटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रवींद्र दंदे सर यांनी केले.

यानंतर विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यात देशभक्तीपर गीत गायन तसेच सामूहिक नृत्य आणि नाटिका सादर करण्यात आल्या. या नाटिका तसेच नृत्य सराव घेण्यात वर्ग 5 ते 7 साठी श्री रवींद्र दंदे सर व वर्ग 1 ते 4 साठी कु वर्षा दळवे मॅडम यांनी भरपूर मेहनत घेतली. सर्व प्रकारचे तांत्रिक साहाय्य श्री निलेश लटपटे यांनी पाहिले.
 सांस्कृतिक कार्यक्रमास गावकऱ्यांची प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती.
अश्याप्रकारे जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा जांब येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात पार पडला.

जय हिंद.

1 comment: