महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

January 23, 2017

शिक्षणाची वारी औरंगाबाद (आढावा)

--शिक्षणाची वारी--
एक अविस्मरणीय आनंदानुभव.........





शिक्षणाची वारी-
राज्य भरातील विविध ठिकाणी सुरू असलेले शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोग शिक्षकांना एकाच ठिकाणी पाहता यावेत,ग्रामीण भागातील जनतेला  महाराष्ट्राचा शिक्षण विभागात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कोणते कार्य चालू आहे हे नेमकेपणानं कळावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून व शिक्षणमंत्री ना.श्री.विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली  वारीची ही वाटचाल शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा.श्री.नंदकुमार साहेब यांचेसह शिक्षण संचालक श्री.गोविंद नांदेडे व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातुन राज्याच्या कानाकोप-यात पोहचली आहे.ह्या वारीस भेट दिल्यानंतर
शिक्षकांमध्ये काम करण्याची उर्मी निर्माण होत आहे.
                       शिक्षणाच्या वारीच्या आयोजनामुळे मागील वर्षी मिळालेला प्रतिसाद व त्यानंतर राज्यभरात मराठी शाळांमध्ये उभे राहिलेले काम लक्ष्यात घेत या वर्षी याचे नियोजन बदलत पुणे ,नागपूर व शेवटच्या टप्प्यात औरंगाबाद येथे झाले.  विभागवार शिक्षकांनी वारीत सहभाग नोंदवून तेथील नाविन्याचा अनुभव घेतला.
               
                 
              *काय होतं वारीत*
खरं तर काय नव्हतं वारीत?गणिताचं मोजता येणार नाही इतकं शैक्षणिक साहित्य,भाषा व इंग्रजीचं अगणित साहित्य,क्रिडा व खेळ,कला व कार्यानुभव,संगित.असं सारं सारं होतं वारीत.अगदी मूळाक्षरांपासून वाक्य व परिच्छेदांचे वाचन लेखन,अंक ओळख ते सर्व गणिती क्रियांचे सुलभीकरण करण्याच्या पद्धती,बीज गणित,भूमिती इ.सगळं सगळं होतं.
                    -कोण कोण भेटलं वारीत-
                   या वारीत राज्यभरातील सोशियल माध्यमातुन भेटत असणारी प्रेरक व्यक्तिमत्व मला ह्या वारीत भेटली. याचबरोबर ज्यांची नुसती नावं ऐकली होती असे शिक्षण क्षेत्रातले भगीरथ प्रयत्न करणारे व राज्यातील वाड्या वस्त्या तांडे पाड्यांवर ज्यांचे कार्य पोहचले असे प्रयोगशील तंत्रस्नेही शिक्षक ह्या वारीत भेटले.
सोमनाथ वाळके, अनिल सोनुने, दत्ता पाटील, रवि भापकर, महेंद्र धिमते, प्रविण ढाकणे, आनंद अनेमवाड, नामदेव बेलदार, उमेश खेडकर व संदीप लेंडे यांचेसह औरंगाबादचे जिल्हा शिक्षणाधिकारी रहीम मोगल साहेब, कुमठे बिटाच्या विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे मॅडम, ज्योती परिहार मॅडम आदींची भेट झाली.असा सगळा गोतावळा भेटला.
**शब्द अपुरे पडतील अशी शिक्षणाची वारी अनुभवायला मिळाली..
 भव्य दिव्य जिमखाना स्टेडीयम मध्ये शिक्षणाची वारी सजलेली होती. आम्ही स्टेडीयम मध्ये प्रवेश केला.आयोजनाचे भव्यदिव्य स्वरूप पाहून आश्चर्याचा धक्का बसला.अतिशय योग्य नियोजनाने तेथील एकेका युनिटला प्रवेश दिला जात होता.
         हॉल मध्ये प्रवेश केल्यावर आतील दृश्य शैक्षणिक क्षेत्रातील विस्मयकारक काम करणा-या शिक्षकांच्या विविध स्टॉलने सजलेला होता.एकूण ५३ स्टॉल एकाच हॉलमध्ये भरवण्यात आले होते.प्रत्येक स्टॉलवरील उपक्रमशील शिक्षक व त्यांचे अधिकारी अतिशय तन्मयतेने आपल्या उपक्रमाची माहिती सदर करत होते. शिक्षक प्रत्येक स्टॉल मध्ये जाणून माहिती घेत होते.



स्टॉल क्र. १ ते ५३ मध्ये शिक्षकांना मिळाली अनुभुती
 स्टॉल क्र.  १ ला स्टॉल सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटाचा होता.ज्ञानारचनावाद आधारित विविध साहित्य त्यांची मांडणी ह्यात केली होती.ह्या दालनातील  शिक्षकांची उपस्थितांना आपल्या उपक्रमांची सांगण्याची तळमळ वाखाणण्यासारखी होती.येथील शिक्षक दालनास भेट देणाऱ्या सगळ्यांनाच पोट तिडकीने मार्गदर्शन करत होते. आम्ही येथे प्रत्यक्ष संकल्पना कृती करून पहिल्यात समजून घेतल्यात. ज्ञानारचनावाद अध्ययन अध्यापनाची खरी ओळख करून देणा-या कुमठे बीटच्या भराडे मॅडम व त्यांचे शिक्षकांनी राबवलेले आदर्श उपक्रमांनी पहिला स्टॉल सजला होता सर्वात जास्त गर्दी या स्टॉलवर होती.कुमठे बीटाला मला जाण्याची संधी मिळाली होती तरीही त्यांच्या साहित्यांची ओळख करून घेतली .
 स्टॉल क्र.२ रा स्टॉल पारेवाडी ता जामखेड येथील प्राथमिक शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रविंद्र भापकर यांचा होता.ओनलाईन टेस्ट निर्मिती प्रात्यक्षिक व मार्गदर्शन  यासंबंधी ह्या दालनात शिक्षकांना पॉवर पोईंट प्रेझेंटेशन,ओनलाईन टेस्ट, वेब पोर्टल निर्मिती ह्या विषयी मार्गदर्शन मिळाले.
 स्टॉल क्र. ३रा स्टॉल एकविरा विद्यालय कांदिवली मुंबई यांचे होते.आनंददायी सोपे शिक्षण ह्यावर ह्या दालनात मार्गदर्शन मिळाले.
 स्टॉल क्र.४ था स्टॉल माझी शाळा माझे नवोउपक्रम ह्या कुलूप लागलेल्या शाळेचे उपक्रम अनुभवायला मिळालेत.शिक्षकाने आपल्या कामातुन तिन वर्ष्यात केलेला बदल अख्या महाराष्ट्राने ह्या दालनात अनुभवला. तेथील शिक्षक उत्सहाने  मार्गदर्शन करत होते.  
 स्टॉल क्र. ५ वा स्टॉल शांतिलाल मुठा फौंडेशन यांचा होता.ह्या दालनात मूल्यवर्धन ह्या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्रमाची माहिती शिक्षकांना मिळाली .अनेकांनी त्यांनी केलेल्या अवाहन प्रमाणे आपल्या शाळांची महिती भरून दिली.
 स्टॉल क्र.६वा स्टॉल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरी ता आष्टी जिल्हा बीड शाळेच्या कला शिक्षणात तंत्रज्ञानाचा अभिनव वापर ह्या दालनात तंत्रस्नेही मार्गदर्शन सोमनाथ वाळके यांनी त्यांच्या शाळेतील वापर करा. ओके स्टुडीओ, स्पिकर्स च्या माध्यमातुन मूल्यमापन ही भन्नाट प्रक्रिया ह्या दालनात मिळाली.
 स्टॉल क्र.७ वा मिशन प्रगत हवेली ह्या दालनात रचनावाद तशेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवण्यासाठी राबवत असलेले उपक्रम ह्या दालनात मांडण्यात आले होते.
 स्टॉल क्र.८ व्या स्टॉलवर जि पं शाळा सुलतानपूर ता नांदगाव खंडेश्वर जि अमरावती ह्या दालनात उपक्रमशील शिक्षक सदानंद वाघ आपल्या शाळेवर राबवलेल्या क्रीडा प्रयोगांचे सादरीकरण पहायला मिळाले.त्यांनी एकलव्य अॅक्यडमी मधून दुर्लक्षित घटकांना देत असलेल्या संधीचे सादरीकरण पहायला सर्वच ह्या दालनात थबकत असत.
  स्टॉल क्र.९ व्या स्टॉलवर राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान ह्या दालनात मुलांचे जलदगतीने शिक्षण व ALP या पद्धतीने खेळ पद्धतीने स्वयं अध्ययन साहित्य व शिकवणे ह्या पद्धतीचे या ठिकाणी प्रात्यक्षिक पहायला मिळालेत.
स्टॉल क्र.१० जाणीव ट्रस्ट आणि पालघर जिल्हा पोलिस यांनी भयं, स्पर्श, विचार , संस्कार, प्रलोभन आणि व्यसन या विषयावर जाणीव जागृती ट्रस्ट ची विस्तृत जनजागृती अभियान याची माहिती  मिळाली
स्टॉल क्र.११ धृव एज्युकेशन अन्ड रिचर्स फौंडेशन पुणे यांनी ह्या दालनात समावेशित शिक्षण कोणासाठी व समावेशित नेमक वेगळ काय करावं लागत फौंडेशनचे कार्याची ह्या  स्टॉलवर उपक्रम सजवण्यात आलेले होते
स्टॉल क्र. १२ बी एम सी मराठी शाळा नंबर २ चेम्बुर नाका यांनी आपल्या शाळेत बहु भाषिक विध्यार्थ्यांना बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे आणण्यासाठी केलेल्या शब्द कोश तशेच बोली भाषेचे विविध प्रयोग यांचा उपक्रम बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे शिक्षकांना प्रेरणा देणारा होता. 
स्टॉल क्र.१३ ह्या दालनात लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा भामरागड जि गडचिरोली यांनी आपल्या शाळेत इंग्रजी विषय शिक्षणाच्या विविध प्रयोग ह्या दालनात मांडलेले होते.
कला व कार्यानुभव बाहुली नाट्य निर्मिती येथे प्रत्यक्ष बाहुल्या निर्मिती शिकण्यास मिळाली. 
 स्टॉल क्र. १४ जि पं शाळा देवघर ता म्हसाळा जि रायगड यांनी विज्ञान साक्षरता ह्या दालनात शिक्षक संदीप जाधव यांनी विज्ञान विषयाचे विविध प्रयोग ह्या ठिकाणी मांडलेले होते.शास्रज्ञान्यांची माहिती पत्रके वैज्ञानिक प्रयोग ह्या ठिकाणी मांडलेले होते.
 स्टॉल क्र. १५ एसआयडब्ल्यूएस एनआर स्वामी कॉलेज वडाळा मुंबई यांनीहिंदी भाषा शिक्षणाचे विविव्ध प्रयोग ह्या ठिकाणी मांडलेल होते.
  स्टॉल क्र.१६ जि पं शाळा गनेरी ता.घाटंजी यवतमाळ टाकाऊ साहित्यापासून टिकाऊ साहित्य निर्मिती ह्या दालनात उपशिक्षक संदीप मोहडे यांनी नाविन्य पूर्ण साहित्याची केलेली निर्मिती प्रतेक शिक्षकाला आपल्या दालनात साहित्याच्या जवळ येण्यास भाग पडत होते नाविन्यता ह्या साहित्यातून येथे अनुभवयाला मिळाली. ज्ञानारचनावाद अध्ययन अध्यापनाची विविध साहित्य निर्मिती व वापर यांनी भरलेला होता.
 स्टॉल क्र.१७ प्रा शा कन्या उर्दू शिरडशापूर ता औंढा जिल्हा हिंगोली ह्या शाळेचा होता ह्या दालनात ईलर्निंग, व्हिडीओ निर्मिती, डिजिटलस्कुल, एज्युकेशन अप ह्या साहित्यावर आधारित दालन होते.
  स्टॉल क्र.१८ जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्था औरंगाबाद अमरावती यांचा होता.ह्या ठिकाणी गणित संबोधांची शिक्षकांना मार्गदर्शन केले जात होते.अपूर्णांक, संख्यामालेवर गणिते, क्लुप्त्या, सूत्रे ह्या ठिकाणी अनुभवास मिळाली.
   स्टॉल क्र.१९  हा स्टॉल  होता आमच्या  नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सुरेगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उमेश खेडकर व संदीप लेंडे यांनी शाळा स्तरावर राबवत असलेल्या विविध उपक्रमांनी भरलेला.आयएसओ मानाकीत शाळा,स्वच्छ शाळा सुंदर शाळा,राज्य पुरस्कारासाठी पात्र,१०० %प्रगत शाळा,ओझ्याविना शिक्षण व दप्तराविना शाळा, शैक्षणिक गुणवत्त्ता विकास कार्य्कार्म,तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रम,शाळेने लोकसहभागातून घेतलेली उतुंग भरारी, लोकसहभागातून साकारले शाळेचे सहशालेय उपक्रम, यांचा होता. शिक्षक सतत ह्या दालनात रेंगाळत शाळेचे उपक्रम पहात होते.हा दालन शिक्षकांचे लक्ष्य वेधून घेत होते. 
 स्टॉल क्र. २० हा जि प शाळा कोटण ता. पाटोदा जिल्हा बीड ह्या शाळेचा होता. नवोपक्रम किशोर मंच, बहुवर्ग अध्यापन, आनंददायी बौद्धिक खेळ आदि उपक्रम ह्या दालनात शाळेने लावलेले होते.शाळेतली अभिरूप बँक तशेच इतर अनेक उपक्रम ह्या ठिकाणी पहायला मिळत होती. व ह्या उपक्रमांचे फायदे ह्या ठिकाणी पहायला मिळत होती.
 स्टॉल क्र.२१ जि प शाळा मलयान मराठी जिल्हा पालघर या दालनाचे आनंद अनेमवाड व त्यांच्या सहकार्यांनी ह्या दालनात व्हर्चुअल क्लास रूम मध्ये अप्लिकेशन च्या माध्यमातुन विध्यार्थ्यांना अनुभव देण्याचा हा उपक्रम राज्यभरातील शिक्षकांनी डोक्यावर घेतला.तीनही दिवस शिक्षकांनी ह्या दालनास गराडा घातलेला सर्वानी पहिला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना जीवंत अनुभव तशेच भौगोलिक व वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करता येत होत्या. हे ह्या दालनाचे विशेष होते.
 स्टॉल क्र.२२ विद्या वर्धिनी शाळा अमहदपूर जिल्हा लातूर ह्या शाळेचे दालन होते.विविध शैक्षणिक अप् तसेच शाळेवरील नाविन्य पूर्ण प्रयोग ह्या ठिकाणी पहावयास मिळालीत.
  स्टॉल क्र.२३ केंद्रीय प्राथमिक शाळा क्र ५१ नूल  जि. कोल्हापूर भाषिक संरचना, शालेय विषयात विशिष्ठ पद्धतीने कार्यनिर्मिती ,पाठ्य पुस्तक शिकवण्याच्या नवं पद्धती ह्या दालनात शाळा व शिक्षकांनी  सजला होता.
 स्टॉल क्र.२४ सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, यांनी पूर्व प्राथमिक शिक्षनात विध्यार्थ्यांना व अंगणवाडीत राबवता येऊ शकणाऱ्या प्रयोगाची ह्या ठिकाणी मांडणी केलेली होती.
  स्टॉल क्र.२५ जि प शाळा निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे समाजाचा सहभाग आणि विधी विनियोग ह्या बाबींवर दालनात साहित्याची मांडणी केली होती. लोक सहभागातून शाळेत केलेला बदल शाळा स्तरावरील ह्या ठिकाणी लावला आढळला.
 स्टॉल क्र.२६ जि पं पूर्व माध्यमिक शाळा देवगाव ता धामणगाव जिल्हा अमरावती यांचा होता.ह्या दालनाच्या शिक्षिका दिपाली बाभुळकर यांनी बोलक्या बाहुल्यांच्या मदतीने मनोरंजनातून सहज शिक्षणाकडे ,कला विषयात विद्यार्थ्यांची रुची वाढवणे. सांस्कृतिक कला संवर्धन, अध्ययन अध्यापनात रंजकता, व्यक्तिमत्व विकास साधने है उदिष्ठ होते ह्या शिक्षिकेने दोनशेहून अधिक बाहुल्या व त्यांचे नाटिका सादर केल्या. तीनही दिवस ह्या दालनास राज्यभरातुन येणाऱ्या शिक्षकांनी गराडा घातलेला आढळला. हे दालन येणा-या सर्वाचे लक्ष वेधून घेत होते
 स्टॉल क्र. २७ जि प शाळा सिंदोन औरंगाबाद ह्या शाळेच्या शिक्षिका संगीता चव्हाण यांचा  होता. मुलींच्या सुरक्षा व त्या दृष्टीने काय तजवीज  तसेच मुलींच्या शिक्षण व सुरक्षेसाठी करावयाच्या योजना ह्या संदर्भात  दालनात  मांडणी होती.
 स्टॉल क्र.२८ जि प शाळा संतोषनगर ता रोहा जिल्हा रायगड यांनी व्यवहारातील शब्दसंग्रह, इयत्ता पाहिली मधील पाठ्यक्रमातील कवितेचे बोली भाषेतून अनुवादसह राज्यभरातील बोली भाषा व त्यांचे अर्थ ह्या ठिकाणी विस्तृत प्रमाणात दिलेली होती.पाठ्य पुस्तकातील कथांचे बोली भाषेतून अनुवाद हे साहित्य दालनात लावलेलं होते.
  स्टॉल क्र.२९ वराह मिहीर विज्ञान केंद्र ओंकार विद्यालय औरंगाबाद यांचा विविध प्रयोगांचे ह्या ठिकाणी दालन होते.
 स्टॉल क्र. ३० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळहिवरा दिग्रस जिल्हा यवतमाळ ह्या शाळेचे शिक्षक सुरेश बाहेकर यांनी सांकेतिक भाषेतुन प्रमाण भाष्या  शिकवली होती मुल हावभावातून शब्द व वाक्य अचूक ओळखत.एका विद्यार्थ्याने दुसऱ्या  विद्यार्थ्यास शब्दाच्या खुणा करत पहिल्या मुलाने हे शब्द ओळखणे हा उपक्रम ह्या ठिकाणी मांडलेला होता.दिवस भर ह्या दालनापुढील गर्दी ह्त्लीच नाही ह्या शिक्षकाने इंग्रजी तसेच इतरही तयारी ह्याच पद्धतीने तयार केली होती.
 स्टॉल क्र.३२  शिक्षण विभाग पंचायत समिती कराड यांनी गटस्तरीय अध्ययन अनुभव यांनी ज्ञान रचनावादावर तळफळ्याची रचना केलेली होती.ज्ञानरचना वादाच्या पायऱ्या ह्या बाबी ह्या ठिकाणी व  विविध शैक्षणिक खेळ व साहित्य जाणून, गटस्तरीय अध्ययन अनुभव घेण्यासाठी शिक्षक ह्या दालनात रेंगाळत होते.
स्टॉल क्र.३३ जि पं शाळा इसापूर व दहेगाव (र) या शाळांच्या ह्या दालनात एका शाळेने क्रीडा विषयाचे उपक्रम मांडण्यात आले होते. तर दुसऱ्या शाळेने गणित व भाषां विषयाची विविध साहित्य ह्या ठिकाणी मांडलेले होते.
स्टॉल क्र.३४  दिवंगत शिताराम आबाजी बिबवे पी एम सी इंग्लिश स्कुल न १ बिबवेवाडी हवेली जि पुणे यांनी इंग्रजी विषयाचा साहित्य तशेच उपक्रम लावलेले होते ह्या उपक्रमांनी  सर्वांचे लक्ष वेधले. 
स्टॉल क्र.३५ जि पं शाळा जेऊर ता अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार वसंतपुरे समाज सहभाग व विधी विनियोग उपक्रमातुन माझी शाळा माझे उपक्रम, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास उपक्रम, जीवनशाळा, शैक्षणिक तक धिना धीन, विचार तुम्ही सांगतो आम्ही, दैनिक तापमाननोंद, जो तारीख तो पाढा, आधार विद्यार्थी वित्त बँक ह्या अंतर्गत गुणवत्ता विकासासाठी शाळा स्तरावर राबवत असलेले उपक्रम ह्या ठिकाणी पहावयास मिळाले.
स्टॉल क्र.३६  ढाकणेवाडी ता शिराळा जिल्हा सांगली  येथील व अख्या महाराष्ट्राला परिचित असलेली भावंडे प्रविण ढाकरे व जयदीप ढाकरे व सहकारी शिक्षकांनी गायन व संगीत क्षेत्राचा वापर करून ई लर्निंग शैक्षणिक साहित्य निर्मिती ह्या दालनात वारीत गेल्यावर मी स्वत्त चार वेळेस भेट दिली .महाराष्ट्राच्या द-या खोऱ्यात ज्यांचा आवाज व संगीतबद्ध केलेल्या शैक्षणिक साहित्याच्या ऑडीओ ऐकण्यासाठी शिक्षकांच्या गर्दीचा पूर ह्या दालनातून ओसरलाच नाही असे चित्र अख्या वारकऱ्यांनी अनुभवले. व्हिडीओ निर्मितीचे मार्गदर्शन दोघाही मार्गदर्शक बंधुनी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
स्टॉल क्र.३७ ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय भिवंडी शाळेच्या वतीने ह्या दालनात क्रीडा आरोग्य शिक्षण क्रीडा प्रशिक्षण विभाग शिक्क्षण विभागाच्या वैशिष्टे शालांत परीक्षांच्या निकालाचे वर्गीकरण, स्तरानुसार प्रशिक्षणाचे घटक ह्या बाबीवर ह्या दालनात मार्गदर्शन करण्यात आले.
 स्टॉल क्र.३८ जि प केंद्रीय प्राथमिक शाळा खीळद.ता आष्टी जिल्हा बीड ह्या शाळेचे स्वच्छता व आरोग्य ह्या विषयावर उपक्रमांची मांडणी ह्या दालनात होती.आबासाहेब चव्हाण व पद्मिनी चव्हाण यांनी शाळा स्वच्छ व सुंदर शाळेचे भित्ती पत्रक तशेच शाळा स्तरावरील उपक्रमांची मांडणी केली
 स्टॉल क्र ३९ जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था लोणी काळभोर पुणे यांचा होता. दिव्यांग मुलांसाठी राबवलेले उपक्रम ह्या ठिकाणी राज्यभरातील शिक्षकांना पहायला मिळालीत.
स्टॉल क्र.४० राज्य आंग्ल भाष्या संस्था औरंगाबाद ह्या संस्थेने इंग्रजी   विद्यार्थ्यांच्या मनातून इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी काय केले पाहिजे, इंग्रजी पाठ्यक्रम व घटकांचे अध्यापन कसे करावे, कोणते भाषिक उपक्रम घ्यावेत ह्या बाबतीत ह्या दालनात मार्गदर्शन करण्यात आले होते.
स्टॉल क्र ४१ दयानंद महाविद्यालय लातूर यांनी अपूर्व विज्ञान मेळाव्यातून विज्ञानाच्या संकल्पना प्रत्यक्ष चित्रांच्या सहाय्याने कश्या स्पष्ट कराव्यात ह्या बाबत मार्गदर्शन करण्यात आले होते.
स्टॉल क्र ४२ संस्कृत भारती पुणे यांनी हसत खेळत संस्कृत शिकूया हे दालन मांडलेले होते, संस्कृत शिकण्यासाठी चे विविध फंडे ह्या ठिकाणी राबवलेले आढळले.भाषा विकासासाठी राबवता येणारे उपक्रम ह्या ठिकाणी पहावयास मिळालीत.
 स्टॉल क्र ४३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळूंजे ता त्रंबकेश्वर शाळेचे उपक्रमशील शिक्षक नामदेव बेलदार यांनी आपल्या शाळेवर टाकाऊ साहित्यापासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य तयार केले होते. या शैक्षणिक साहित्याचे वैशिष्ट्ये म्हणजे ते टाकाऊ पासून टिकाऊ, बहुउद्देशीय आहे त्याचबरोबर भाषा, गणित, इंग्रजी या तीनही विषयांसाठी उपयुक्त असून या विषयांतील विविध मुलभूत संकल्पना व संबोध स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त आहे, या साहित्याच्या माध्यामातून विद्यार्थ्याना आनंददायी, कृतियुक्त, व मनोरंजनातून शिक्षण हे उद्दिष्ट साध्य होत असून विद्यार्थी ताणतणावरहित शिक्षण घेत आहेत. या साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासही मोठी मदत होत आहे. विविध प्रकारचे भंगार बाजारातील प्लायवूड वापरून  त्यावर आकर्षक ज्ञानरचनावादी आरेखन केले असून कचऱ्यातील विविध वस्तूंच्या वापर करून त्यांनी अनेक प्रकारचे शैक्षणिक पूरक साहित्य मोठ्या मेहनतीने व कल्पकतेने तयार केले आहे.त्यांच्या या साहित्याची व उपक्रमाची राज्यभरातील शिक्षक तसेच अधिकारी, शिक्षकांनी कौतुक केले.
स्टॉल क्र.४४ राज्य विज्ञान शिक्षन संस्था नागपूर यांनी ह्या ठिकाणी आपल्या उपक्रमांची मांडणी केलेली होती. प्रज्ञा शोध परीक्षा, इन्स्पायर अवार्ड  ह्यासह वैज्ञानिक उपक्रम तसेच स्पर्धा परीक्षा ह्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले.
 स्टॉल क्र ४५ जि प प्राथमिक शाळा मुडानां ता महागाव जिल्हा यवतमाळ ह्या शाळेचा तंबाखू मुक्त शाळा व तंबाखू मुक्त जिल्हा ह्या उपक्रमाचा दालन लावलेला होता.
स्टॉल क्र.४६ जि प प्राथमिक शाळा अंजूरफाटा भिवंडी जिल्हा ठाणे  यांनी आपल्या शाळेवर ई लायब्ररी कशी असावी याचे मार्गदर्शन करण्यात आले होते. वाचन साहित्याचे श्रवणाद्वारे मुलांच्या भाषिक विकासासाठी एक अभिनव उपक्रम ह्या ठिकाणी मांडलेला होता.
स्टॉल क्र.४७ राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था या मार्फत स्कील डेवल्पमेंट साठी व  व्यावसायिक शिक्षणाचे धडे देणारा होता. 
स्टॉल क्र.४८ जि प प्राथमिक शाळा मानवली नेरळ ता कर्जत जिल्हा रायगड स्पोकन इंग्रजी व भाषा समृद्धीचे प्रयोग ह्या ठिकाणी अनुभवायला मिळालीत.
स्टॉल क्र.४९ पुनरुथान समरसता गुरुकुलम चिंचवड यांनी हस्तकलेचे भांडार ह्या ठिकाणी आढळले. अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तु ह्या ठिकाणी मांडलेल्या आढळल्या कुंभार कामाचे प्रात्यक्षिक ह्या ठिकाणी करून दाखवले जात होते.
  स्टॉल क्र.५० सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने विविध आजारांवर वेगवेगळ्या पद्धती व आरोग्य विषयक सल्ले ह्या ठिकाणी देण्यात येत होते.मधू मेह टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत होते.
स्टॉल क्र ५१ स्टॉलमध्ये आम्हाला शिक्षणाचा खजिना अनुभवायला मिळाला. बालभारती पुणेच्या वतीने ह्या ठिकाणी विविध पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले
स्टॉल क्र ५२ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च्य माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतिने हा दालन लावण्यात आला होता. विविध परीक्षा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन ह्या ठिकाणी लावण्यात आलेले होते.पुस्तकांची संख्या सर्वाधिक होती.
स्टॉल क्र.५३ येथे कै दादा पाटील चौधरी स्पोर्ट्स असोशियशन गारखेडा बीट ता जि औरंगाबाद यांनी या ठिकाणी  मुलींचा दोरखांबचा चमू त्यांनी तयार केला होता. विद्यार्थिनींनी दोरखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. दोरखांब वरील मुलींचे आत्मविश्वास खूपच विस्मयकारक होता. मेणबत्ती कपाळावर ठेवून सादर केलेले दोरखांबचे प्रात्यक्षिक पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणेच फेडणारा होता.
याचं बरोबर शिक्षकांनी पथनाट्य तशेच कीर्तन सादर केले.स्टेडियम हॉलमध्ये शिक्षणाची सहविचार सभा घेण्यात आली.
                   राज्यस्तरावर उपक्रमशील शिक्षकांना आपल्या कौशल्य दाखवण्याची संधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिली याबाबत शिक्षण मंत्री मा.विनोदजी तावडे सचिव नंदकुमार साहेब यांसह आयोजकांचे मनापासून धन्यवाद !!!
शब्दांकन
(श्री खंडु नानाजी मोरे)

No comments:

Post a Comment